महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा पोलिसांची सूत्र IPS सोमय मुंडे यांनी हातात घेतल्या पासून जिल्ह्यातील सर्व अवैद्य धंदे बंद झाले होते. खास करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात खुटखा पकडून कडक कारवाई केली होती. या कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे
नागरिकांनी कौतुक केले, पण गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यात आणि शहरात गुटखा विक्रीचे अनेक केंद्रे राजरोसपणे सुरु आहे. लातूर (latur) जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री अनेक केंद्राद्वारे केली जात आहे. यामध्ये आता केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेतील
काही व्यापारीही गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले आहे. त्याचे थेट कनेक्शन कर्नाटकपर्यंत असल्याचे बोलले जात असले, तरी या प्रकरणी तपास करणारी यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरली आहे. पानपट्टी, टपरी व अन्य फेरीवाल्यांमार्फत त्याचे वितरण केले जात होते. मात्र आता या व्यवसायात काही व्यापारी उतरल्याची
शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेतील घाऊक विक्रेत्यांना हेरून त्यांच्याकडे नेहमी खरेदी करणाऱ्या छोट्या व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना या जाळ्यात ओढले जात आहे. त्यातून नवी साखळी तयार झाली आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेसह आजूबाजूच्या छोट्या बाजारपेठेतही हे जाळे निर्माण झाले आहे. गुटखा विक्री
प्रकरणात आतापर्यंत झालेल्या कारवाईत ठराविक व्यक्तींची नावे पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत. तरीदेखील पोलीस यंत्रणा मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहचू शकलेली नाही. मुळात गुटख्याचे वितरणच कर्नाटकमधून होत असल्याचे याआधीही पोलिसांनी स्पष्ट केले होते. कर्नाटकमध्ये गुटख्याला बंदी नसल्याने त्याचा या व्यावसायिकांनी
फायदा उठवला आहे. परंतु या प्रकरणातील संबंधित आरोपी हे सांघिक गुन्हेगारीत असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करता येत नाही . परंतु आता गुटखा विक्रीचे जाळे आणखी घट्ट झाल्याने व त्यात युवक व तरुण मुलं व्यसनाधीन झाल्याने पालक वर्ग चिंताग्रस्त बनला आहे आणि शिक्षणातील लातूर पॅटर्नची प्रतिमा मलिन होत आहे.