PM Narendr modi भारत वेगाने स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे आणि लातूरही यात आपली भूमिका बजावत आहे! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – “भारत वेगाने स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे आणि लातूरही यात आपली भूमिका बजावत आहे” असे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या ट्विटला रिट्विट करून म्हणाले आहेत. ही बाब लातूर साठी आणि विशेषतः खासदार सुधाकर शृंगारे यांच्या

साठी खूप महत्वाची आहे. करण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी एखाद्या खासदारच्या म्हणण्याला चांगली प्रतिक्रिया दिली आहे. हा मान सन्मान लातूरच्या कुठल्याच म्हणजे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश अप्पा कराड भाजपाच्या या नेत्यांना मिळाला नाही. पंतप्रधानांच्या ट्विट मुळे खासदार सुधाकर

शृंगारे यांचा मान आणि लातूरच्या राजकारणात वजन नक्की वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रिट्विट बद्दल खासदार सुधाकर शृंगारे यांनी शतशः आभार मानले आहेत. मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. निश्चित करण्यात आलेल्या 200 पैकी 120 वंदे

भारत रेल्वे ह्या लातुरमध्ये तयार होणार असून उर्वरित 80 रेल्वे ह्या चेन्नईमध्ये तयार होणार आहेत. वंदे भारत रेल्वेच्या सर्व बोगी ह्या स्टीलमध्ये बनविण्यात येणार आहेत. तर वंदे भारत हि सेमी हाय-स्पीड ट्रेन असून ज्यामध्ये 16 सेल्फ प्रोफेल्ड कोच आहेत . विशेष म्हणजे तिला वेगळ्या इंजिनची आवश्यकता नाही . या रेल्वे गाड्या वातानुकूलित

असून जिवाणू विरोधी प्रणाली यामध्ये असणार असल्याचे
सांगण्यात आले आहे . 140 सेकंदात 160 किमी ताशी वेग घेण्याची क्षमता या गाड्यांमध्ये असणार आहे . केंद्र सरकारने 2021-2022 च्या अर्थसंकल्पात 2024 ते 2025 च्या अखेरीस भारतात 400 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्याचे महत्वकांक्षी लक्ष ठेवले आहे . परदेशातही

या वंदे भारत रेल्वे गाड्या पाठविण्याचा सरकारचा मनोदय आहे. या मुळे लातूरचे नाव आणि लातूर जिल्ह्यात रोजगार, बाजारपेठेत वाढ होणार आहे हे मात्र निश्चित.

Recent Posts