latur congress लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे “हाथ से हाथ जोडो” अभियान जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

महाराष्ट्र खाकी ( रेणापूर / विवेक जगताप ) – राज्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या निर्देशानुसार आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीण मधील हाथ से हाथ जोडो अभियानाचा कासारखेडा येथे शुभारंभ देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी

सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़गडावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले. पण मागील 8 वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरु केलेला

लढा आपण पुढे नेऊ, असे आवाहन करत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पाप उघड करा, असे नाना पटोले  म्हणाले. खासदार राहुल गांधी यांचे विचार, काँग्रेस पक्षाचे विचार आणि गेल्या आठ वर्षातील मोदी

सरकारच्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला जात आहे. याचाच भाग म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, लातूरचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांच्या निर्देशानुसार

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवार (दि.23 फेब्रुवारी) या अभियानाचा शुभारंभ लातूर ग्रामीण मधील कासारखेडा या गावी लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे , ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजयजी देशमुख,

विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन तथा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्र काळेजी, रेना सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीणजी पाटील, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके , मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ॲड.राजकुमार पाटील,ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील, माजी लातूर

तालुकाध्यक्ष दगडू साहेब पडीले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे, सोशल मीडिया काँग्रेस अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी,बालाजी साळुंके, पंडित ढमाले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

Recent Posts