महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडत असलेल्या वेगवेगळ्या गुन्हगारी घटनामधील आरोपी शोधून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवत आहेत. विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधीत घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विशेष
मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत गांधी
चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी स्वतःच्या नेतृत्वात गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करून. गांधी चौक पोलीस
स्टेशन हद्दीतील घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 20/02/2023 रोजी पथक सिद्धेश्वर यात्रेत पाई पेट्रोलिंग करीत असताना प्रकाश मोरे हा मोटार सायकल ढकलत जात असताना दिसला म्हणून त्यास पोलीस पथकातील दामोदर मुळे, रणविर देशमुख,पोलीस
हवालदार रणजीत शिदे, दत्ता शिंदे, शिवाजी पाटील, हनुमंत काटे यांनी त्यास पकडून त्याच्या ताब्यातील मोटार सायकल बाबद विचार पुस केली असता प्रकाश मोरे याने उडवा उडवीचे उत्तर दिले त्यास विश्वासात घेवून माहीती विचारली असता ति मोटार सायकल बसस्थानक लातुर येथुन चोरी केलेचे सांगीतले प्रकाश मोरे यास गांधी चौक
पोलीस स्टेशन गांधी चौक गु.र.न -78/23 कलम-379 भादवि मध्ये अटक करुन अधिक तपास केले असता आरोपीनेप्रकाश मोरे याने कोल्हापुर ,पुणे , अंबाजोगाई, लातूर येथुन 12 मोटार सायकल किंमत-4,35,000/- हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे
यांच्या नेतृत्वात गांधी चौक पोलीस स्टेशनच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या 12 गुन्ह्याची उकल करून 12 मोटार सायकलसह 4 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे आणि लातूर शहर DYSP जितेंद्र
जगदाळे यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनात व गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोह दामोदर मुळे, रणवीर देशमुख , रणजित शिंदे, दत्ता शिंदे, भाऊसाहेब मंथलवाड सुदर्शन पाटील पोना – शिवाजी पाटील, शिवराज अनंतवाड. उपविभागीय कार्यालय शहर यांचे पथकातील- सफौ- ढगे, पारडे, सोनटक्के यांनी पार पाडली