खासदार सुधाकर शृंगारे माजी मुख्यमंत्री कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमातून अचानक निघून गेले

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीदिनी निलंगा शहरातील महाराष्ट्र महाविद्यालच्या प्रांगणावर ब्राॅंझपासून तयार केलेल्या पुतळ्याचे अनावरण देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, दिलीपराव देशमुख, आणि निलंगेकर परिवारातील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत झाले. माजी मुख्यमंत्री कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला, पण या कार्यक्रमानिमित्त खास

आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्ण दौऱ्यात खासदार सुधाकर शृंगारे सोबत होते, ते पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात आले पण थोडावेळ बसून पुतळा अनावरण करण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगून निघून गेले या गोष्टीची छुपी

चर्चा सध्या होत आहे. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे हे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्जितले आणि पुरस्कृत खासदार आहेत हे जगजाहीर आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुनील गायकवाड यांना डावलून शृंगारे यांना उमेदवारी दिली, खासदार सुधाकर शृंगारे संभाजीराव

पाटील निलंगेकर यांना विचारल्या शिवाय कुठले काम करत नाहीत अशी जिल्ह्यात चर्चा आहे. आणि तसे काही प्रसंगावरून दिसून आले आहे. इतक सर्व असताना खासदार सुधाकर शृंगारे कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाच्या स्टेजवर येऊन न

थांबता निघून गेल्याने सर्व नागरिक आश्चर्य वेक्त करत आहेत आणि वेगवेगळे कायास लावत आहेत. खासदार सुधाकर शृंगारे आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कटुता निर्माण झाली आहे का ? कार्यक्रमाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात पूर्ण वेळ देणारे खासदार पुतळा अनावरण होण्याच्या आधीच निघून गेले, अर्धा – एक तास थांबले असते तर पुतळा अनावरणाचा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले असते.

Recent Posts