लातूर मध्ये कलोपासक मंडळातर्फे उद्या बालनाट्य महोत्सव 2022 – 23 चे आयोजन

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्याने शिक्षण, व्यापार, राजकारण, क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. लातूरने कला क्षेत्रात ही आपला ठसा श्रीराम गोजमगुंडे, रितेश देशमुख या कलाकारांनी निर्माण केला आहे. मुलांना अभिनय क्षेत्राची

चांगली ओळख व्हावी यासाठी कलोपासक मंडळाने बालनाट्य महोत्सव 2022 – 23 चे आयोजन केले आहे. या बालनाट्य महोत्सवा बद्दल कलोपासक मंडळाचे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे. आपल्या मुलांनी थिएटर मध्ये बसून

नाटके पाहिला आहे का ? कदाचित 80% उत्तरे नाही अशीच येतील पण लातूरकरांसाठी एक सुवर्ण योग जुळून येत आहे. पुढील पिढीवर नाट्य संस्कार व्हावेत, त्यांना नाटकांचा आनंद घेता यावा आणि लातूर शहरात बालनाट्य चळवळ वाढावी या उद्देशाने कलोपासक

मंडळाने दिनांक 12 फेब्रुवारी रविवारी दगडोजीराव देशमुख सभागृह लातूर येथे बालनाट्य महोत्सव 2022 – 23 याचे आयोजन केले आहे. हे बालनाट्य महोत्सवात प्रत्येक सत्रात 3 शाळांची नाटके सादर होणार आहेत. पहिले सत्र 9.30 ते 12.30, दुसरे सत्र 1.00 ते 4.00,

तिसरे सत्र 4.30 ते 7.30, या 3 सत्रात चालणाऱ्या या बालनाट्य महोत्सवात लातूर शहरातील केशवराज विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय, राजानारायणलाल लाहोटी इंग्लीश विद्यालय, श्री श्री रवीशंकर विद्यालय, सरस्वती

विद्यालय, संवेदना सेरेबरल पाल्सी विकसन केंद्र, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, ज्ञानेश्वर विद्यालय अशा नऊ मान्यवर शाळांचे संघ सहभागी होनार आहेत. या बालनाट्य महोत्सवात दर्जेदार नाटकांचा समावेश असनार आहे. सुमारे 125 बालकलाकार आपली नाट्य कला

लातूरकरांसमोर सादर करणार आहेत.या महोत्सवाच्या निमित्ताने विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बालनाट्यासाठी एकत्रित रंगमंच उपलब्ध करून देण्याचे कार्य कलोपासक मंडळ करत आहे. यातून शालेय विश्वात बालनाट्याची संस्कृती रुजून शहरातील सर्वच शाळांत बालनाट्य

सादरीकरण पुन्हा सुरू होईल अशी खात्री आहे असे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी विश्वास वेक्त केला आहे . तरी या महोत्सवाला आपल्या लातूर शहरातील नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनी आपल्या परिवारासह उपस्थिती नोंदवून बालनाट्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे .

Recent Posts