महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील औसा राेडवरील शहा मॅडम यांच्या किडीज् इन्फाे पार्क स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकाने वर्गात चिडवल्याने खचलेल्या 9 वीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गेल्या
महिन्यात घडली होती. याची राज्य महिला आयोगाने दखल घेत संबंधित सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या गुन्ह्याचे शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी आरोपी राहुल जे पवार यास अटक केली
आहे. पोलिसांनी तपास पुर्ण करुन लवकरात लवकर दोषारोप पत्र दाखल करावे यासाठी आयोग पाठपुरावा करत आहे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे . लातूर पोलिस अधिक्षक
सोमय मुंडे व संबंधित घटनेतील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी अतिशय तत्परतेने व जलद यंत्रणा राबवित आरोपीस अटक केली आहे. या कारवाईबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
रुपाली चाकणकर यांनी लातूर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व संबंधित घटनेतील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांचे कौतुक केले आहे. लातूर शहरातील औसा राेडवरील शहा मॅडम यांच्या
किडीज् इन्फाे पार्क स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने आराेपी शिक्षक राहुल जे. पवार याच्याकडे गणित विषयाची खासगी शिकवणी लावली हाेती. दरम्यान, शिकवणे समजत नसल्याने तिने ती
शिकवणी बंद केली. शिकवणी बंद केल्याचा राग मनात धरून, आराेपी शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गात टाेमणे मारले. शिवाय, मानसिक त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत
आत्महत्या केली.आत्महत्या केल्याची घटना मागील महिन्यात 18 जानेवारी राेजी घडली हाेती. याबाबत शहरातील शिवाजीनगर पाेलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता , घटनेपासून आराेपी शिक्षक राहुल जे. पवार
पाेलिसांना गुंगारा देत हाेता. या आरोपी शिक्षक राहुल जे. पवार ला साेमवारी सकाळी राहत्या घरातून पाेलिस पथकाने अटक केली आणि लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची काेठडी सुनावली आहे.