Maharashtra Bjp जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रवक्ते पदी लातूरच्या प्रेरणा होनराव यांची नियुक्ती

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – जगात कुठल्याही राजकीय पार्टीचे जनते प्रती असलेली तळमळ, व्हिजन, किंवा एखाद्या मुद्यावरील पक्षाची भूमिका प्रसार माध्यमाद्वारे लोकांसमोर ठेवणारे प्रवक्ते असतात. आणि हे प्रवक्ते खूप अभ्यासू, शांत आणि समय सूचकतेने परी पूर्ण असतात. जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असलेल्या महाराष्ट्र भाजप प्रदेश च्या प्रवक्त्यांची यादी

काही दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. या यादीत मोठ्या नेत्यांची नावे आहेत. महाराष्ट्र भाजप च्या प्रवक्त्याच्या यादीतील एक नाव सध्या लातूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. ते म्हणजे भाजपा युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव, इतक्या कमी कालावधीत प्रेरणा होनराव यांनी स्वतःच्या ताकतीवर, हिमतीवर हे स्थान मिळवले आहे. प्रेरणा

होनराव यांच्या प्रवक्ते पदाच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातून तर त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे, पण लातूर जिल्ह्यातील लोक मग ते दुसऱ्या पक्षाचे का असेनात त्यानां सुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटत आहे. करण जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रवक्ते पदी लातूरच्या लेकीची नियुक्ती झाली आहे. प्रेरणा होनराव यांच्या संभाषण कौषल्याचे आणि अभ्यासू मुद्देसूद्ध

हजरजबाबीपणा मुळे हि जबाबदारी मिळाली आहे. प्रेरणा होनराव यांनी या आधीहि प्रसार माध्यमासमोर पक्षाची बाजू प्रभावी पणे मंडली आहे, आणि आता इथून पुढे हि पक्षाची बाजू मांडतील यात शंका नाही.

Recent Posts