महाराष्ट्र

लातूर ST विभागातील 52 चालकांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार आणि गौरव

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – महाराष्ट्रात अन्य वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघाताचा रेशो खूप कमी आहे, त्यामुळे अशा विनाअपघात सेवा बजावलेल्या एसटीच्या ड्रायव्हर मंडळींचा 26 जानेवारीच्या गणतंत्र दिनी खास गौरव होणार आहे. एसटी महामंडळाच्या तब्बल 780 चालकांची त्यासाठी निवड झाली आहे. या 780 चालकांमध्ये लातूर विभागाचे 52 चालक आहेत. हि

लातूरसाठी आनंदाची गोष्ट आहे. 25 वर्षे किंवा जास्त कालावधीपेक्षा जास्त कोणताही अपघात न करता एसटीची सेवा केलेल्यांचा त्यात समावेश आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. एसटीला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटले जात असून या सार्वजनिक परीवहन सेवेचा अपघाताचा दर इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी

आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानला जातो. विनाअपघात सेवा बजावलेल्या एसटीच्या ड्रायव्हर मंडळींचा 2012 आणि 31 डिसेंबर 2020 पर्यंत 25 वर्षे पेक्षा त्यापेक्षा अधिक सेवा बजावलेल्यांचा समावेश आहे. खालील चालकांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील लालपरीची विनाअपघात सेवा बजावलेल्या महाराष्ट्रातील 780 ड्रायव्हर

मंडळींचासमावेश आहे तर या 780 मधील लातूर विभागातील 52 ड्रायव्हरांचा समावेश आहे. हि गोष्ट लातूरकरांसाठी अभिमानाची आहे. आणि या विनाअपघात सेवा बजावलेल्या 52 ड्रायव्हरांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Most Popular

To Top