महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरच्या बांधकाम क्षेत्रात नावा प्रगतीचा, विश्वासाचा आणि लातूरच्या वैभवात भर टाकणारे प्रोजेक्ट निर्माण करणारे लातूरचे युवा बांधकाम व्यावसायिक डॉ. धर्मवीर भरती यांची बांधकाम क्षेत्रात देशपातळीवर बांधकाय व्यावसायिकांचे प्रश्न मांडणारी तसेच ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी क्रेडाईला नाविण्यपुर्ण उपक्रम
राबबणारी राज्यात संघटना म्हणून ‘क्रेडाई’ गेली अनेक
वर्षांपासुन देश पातळीवर काम मानाचे करत आहे. या संघटनेची महाराष्ट्र स्थान कार्यकारणी नुकतीच जाहिर झाली.यामध्ये लातूर येथील प्रसिध्द युवा बांधकाम व्यावसायिक डॉ. धर्मवीर भारती यांची राज्य सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतातील प्रसिध्द बांधकाम
व्यावसायिक सतिष मगर यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. डॉ. धर्मवीर भारती हे या अगोदर लातूर क्रेडाईचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच त्यांनी क्रेडाईच्या विविध राज्य कमिटीवर काम केलेले आहे. बांधकाम क्षेत्रातील डॉक्टरेट पदवीही त्यांनी संपादन केलेली आहे. लातूर शहरातील सर्वात मोठा नाविन्यपुर्ण गृहप्रकल्प ते साकारत आहेत. बांधकाम क्षेत्र व क्रेडाई संघटनेसाठी
दिलेल्या योगदानाचा विचार करुन त्यांना राज्य सहसचिव हे महत्वाचे पद देण्यात आले आहे. तसेच आज पर्यंतच्या
लातूर क्रेडाईच्या इतिहासात राज्य पदाधिकारी होण्याचा
बहुमान त्यांना मिळाला आहे. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे
सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.