महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा पोलीस दलाची कमान सोमय मुंडे यांनी हातात घेतल्या पासून त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अवैध धंद्यावरील आणि गंभीर गुन्ह्यामधील आरोपीनां अटक करण्याच्या कारवायांचा आलेख वाढतच आहे. हा वाढता आलेख पाहता जिल्ह्यातील नागरिक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या
मार्गदर्शनात लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 08/01/2023 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास
पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या पथकाने महमदापूर शिवारात पाझर तलावाच्या पाळूवर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता 1) मनोज यादव गुरमे, वय 34 वर्ष, राहणार ममदापूर. 2) देवानंद साधू बनसोडे, वय 38 वर्ष,राहणार ममदापूर. 3) दत्ता व्यंकट कुराडे ,वय 36 वर्ष,राहणार ममदापूर. 4) राजेंद्र बाळू राव शेळके, वय 46 वर्ष,राहणार ममदापूर. 5) कुमार धनंजय
गुरमे ,राहणार ममदापूर. 6) भैय्यासाहेब रमाकांत बनसोडे, राहणार ममदापूर. हे सर्व आरोपी महमदापूर शिवारात पाझर तलावा जवळ ग्रुप करून पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळीत असताना लातूर ग्रामीण पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम व वाहने असा एकूण 1 लाख 73 हजार 30 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सर्व
आरोपी विरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 11/2023 कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यावाही करण्यासाठी निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील
गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पांढरे, पोलीस अमलदार विनोद लखनगिरे, बाबू येनकुरे, सय्यद, महबूब तांबोळी, सचिन चंद्रपाटले, अक्षय डिगोळे, खंडागळे, हजारे यांनी केली आहे.