महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूरच्या राजकारणात आणि लातूर भाजपात आपल्या कार्यातून आणि नेतृत्वातून जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मानत घर करणारे, सर्वसामान्य माणसाला आपलेसे आणि सहज उपलब्ध होणारे नेतृत्व म्हणजे युवा नेते अजित पाटील कव्हेकर, अल्पावधीत अजित पाटील कव्हेकर यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. आणि उद्याचे लातूरचे
नेतृत्व म्हणून लातूरची जनता यांच्याकडे पाहते. अजित पाटील कव्हेकर यांच्या कार्याची दाखल पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने घेऊन त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय व्हावे असा सल्ला देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. देशाचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर ते 12 जानेवारी 2023 मध्ये अटल पर्व अंतर्गत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. यामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेवून राज्यभरातून अटल वक्ते घडविण्याचे काम केलेले आले. याबरोबरच दर्पण दिनानिमित्त पत्रकारितेत योगदान देणार्या पत्रकारांचा सन्मान करण्याचे काम भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच अटल मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कामही राज्यभरासह लातूर भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून
करण्यात आलेले आहे. गेल्या तीन वर्षामध्ये अजित पाटील कव्हेकरांनी सक्रीय योगदान देवून आपल्या संघटन कौशल्याच्या आधारे राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पध्दतीने युवा वॉरियर्सचे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याचा फायदा पक्षाला व्हावा, यासाठी अजित पाटील कव्हेकरांनी आता राज्याच्या राजकारणात सक्रीय व्हावेे, असे प्रतिपादन भाजपा युवा
मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले. ते राजस्थान विद्यालय ते 1.नंबर चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते.