महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – नववर्षाच्या स्वागतोत्सवात मद्यपी चालकांकडून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी लातूर पोलिसांनी जिल्ह्यात मद्यधुंद वाहन चालकांविरोधात धडक कारवाया केल्या . शनिवारी रात्री उशिरापर्यंत लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात देखील स्वतंत्रपणे कारवाया सुरू होत्या .सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत
मोठ्या उत्साहात केले जाते. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनेकांकडून मद्यपान केले जाते. संबंधितांकडून वाहन चालविल्याने अपघाताच्या घटना घडतात. त्यास प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या निर्देशानुसार 31 डिसेंबर रोजी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत लातूर शहर, उदगीर
अहमदपूर, निलंगा या सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी फिक्स पॉईंट रोड पेट्रोलिंग चार्ली पेट्रोलिंग लावून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास 60 टक्के पोलीस स्टाफ न्यू इयर बंदोबस्त कामी ऑन रोडवर होता. या बंदोबस्ता मध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 71 इसमावर कारवाई करण्यात आली असून दारूच्या 14 रेड करण्यात
आल्या आणि जवळपास 63 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कमी जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक ठाणे प्रभारी अधिकारी या बंदोबस्त मध्ये हजर होते. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे