महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – शिक्षण क्षेत्रातात आधुनिक क्रांती करून विद्यार्थ्यांना शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षण देणारी राज्यातील नावाजलेली उत्तम शिक्षण संस्था असलेली श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे (रिलायन्स लातूर पॅटर्न ) संस्थापक अध्यक्ष श्री. प्रा.उमाकांत होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त
उद्या 5 डिसेंबर रोजी महाविद्यालया तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती चौक औसा रोड ते 5 नंबर चौक पर्यंत मॅरेथॉन सर्धेचे आयोजिन केले आहे. नंतर दिवसभर विवीध कार्यक्रम होणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर, विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या
बाबतीत मार्गदर्शन असे बरेच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत तरी या उपक्रमचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजक महेश रुद्रवार, गणेश पोपडे,राहुल कानडे, प्रसिद्ध ऑरोबिक प्रशिक्षक दिपक लोखंडे,समीर डांगरे आणि स्वप्नील पाटील यांनी आवाहन केले आहे.