महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – देशासह राज्यात लातूर पॅटर्न चे नाव गाजवणारे आणि लातूरचे नाव पोहचवणारे श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तसेच रिलायन्स लातूर पॅटर्न चे संचालक प्रा. उमाकांत होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त सकाळी 7 ते 10 या वेळेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी 4.5 KM अंतराची भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात प्रा. उमाकांत होनराव सर यांच्या हस्ते करण्यात आली व स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धाकांना प्रा. उमाकांत होनराव यांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मान करण्यात आला. या मॅरेथॉन स्पर्धेच्या
समारोपा प्रसंगी ओंकार होनराव यांनी सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे तसेच सर्व पोलीस बांधवांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव यांनी पोलीस भरतीसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या व आयोजकांनी अशीच मॅरेथॉन स्पर्धा समस्त लातूरकरांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येईल अशी घोषणा केली.