राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केले मा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतील महिलांसाठी मोफत बस सेवेचे कौतुक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या देशात प्रथमच महिलांना मोफत सिटीबस या योजनेची दखल घेऊन कौतुक केले आणि योजनेचा अहवाल मागवून राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगितले. लातूरच्या राजकारणाचे आणि समाज कार्याचे राज्यात

आणि देशात कौतुक होत असते. लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या कार्यापद्धतीमुळे लातूरचे आणि त्यांचे कौतुक झाले आहे आणि होत आहे. महापौर पदाच्या कार्यकाळात विक्रांत गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरातील महिला आणि विद्यार्थिनींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला . महिला प्रवाशांच्या सोयीसाठी

महापौर पदाच्या कार्यकाळात सर्वसाधारण सभेत निर्णय घेत लातूर महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमासाठी रुपाली चाकणकर लातूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी लातूर मनपाच्या महिलासाठी मोफत बस सेवेचे दाखल घेऊन कोतुक केले आणि असा उपक्रम

राज्यात कसा राबवता येईल यासाठी या महिलासाठी मोफत बस सेवेला अहवाल मागवून राज्य सरकारकडे पाठवणार आणि राज्यात कसा चालू करता येईल यासाठी पाठपुरावा करणार असे सांगितले.

Recent Posts