लातूर महानगरपालिका आयुक्त पदी बाबासाहेब मनोहरे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – मागील काही दिवसापूर्वी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची बदली झाली . तेव्हा पासून लातूर मनपा आयुक्त पदाचा चार्ज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या कडे होता. पण आता लातूर महानगरपालिकेला आयुक्त म्हणून नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती झाली आहे. राज्य

शासनाच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिका – यांच्या बदल्या केल्याचे आदेश काढले गुरुवारी आहेत. या आदेशानूसार नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. या आदेशानूसार बाबासाहेब मनोहरे यांना नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे अतिरिक्त

आयुक्त पदातून कार्यमुक्त करण्यात आले असून लातूर येथे तत्काळ महापालिका आयुक्त पदाचा पदभार घ्यावा याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असेही सुचित केले आहे नांदेड महानगरपालिकेत आणि उस्मानाबाद अशा मराठवाड्यातील शहरात त्यांनी यापूर्वी जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे याभागाची त्यांना उत्तम जाण आहे. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी विविध विभागातील कामकाज सांभाळले आहे यांचा फायदा आता लातूर महानगरपालिकेत काम करताना होणार.

Recent Posts