महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पवार यांची औसा MIDC ला अतिरिक्त जमीन देण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कडे मागणी

महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – राज्याच्या विकासात जसा मोलाचा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. असेच लातूर जिल्ह्यातील औसा मतदार संघाचा विकास अभिमन्यू पवार यांच्या दूरदृष्ठितून होत असताना औशाची जनता अनुभवत आहे. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा सरकारच्या सर्व योजनाचा फायदा नागरिकांना मिळावा यासाठी आमदार अभिमन्यू पवार सतत

प्रयत्नशील असतात. औसा शहरातील उद्योग वाढवेत यासाठी अभिमन्यू पवार यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. औसा एमआयडीसी (Ausa midc) मध्ये नवीन उद्योग उभारण्यासाठी जागा शिल्लक नाही. (Ausa city) औसा शहर लातूरपासून 22 किमी अंतरावर असल्याने आणि महामार्गावरील शहर असल्याने उद्यमींकडून उद्योग उभारणीसाठी जागेची मागणी केली

जात असल्याची बाब उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देत औसा येथे अतिरिक्त एमआयडीसी (MIDC) साठी भूसंपादन करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. भारत सरकार सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी MSE – CDP योजना राबवते. या योजनेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून भारत सरकारने प्रकल्प किंमत

मर्यादा 15 कोटींवरून वाढवून 30 कोटी रु. इतकी केली आहे. भारत सरकार या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 60% – 80% अनुदान देते तर महाराष्ट्र सरकार प्रकल्प खर्चाच्या 10% (जास्तीत जास्त 1.5 कोटी रु.) अनुदान देते. भारत सरकारने प्रकल्प किंमतीत वाढ केल्याने राज्यानेही 2010 च्या शासन निर्णयात सुधारणा करून खर्चाच्या 15% (जास्तीत जास्त 4.5 रु.) अनुदान देण्याचा

निर्णय घ्यावा तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाप्रमाणेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी संवर्गातील राखीव प्रवर्गात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्यात यावा अशी विनंती उद्योगमंत्री उदय सामंत यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.

Most Popular

To Top