महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूरचे वैद्यकीय सेवेत खूप मोठे नाव आहे. लातूरच्या काही डॉक्टर मंडळींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचे आणि लातूरचे नाव कमावले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. अशोक पोद्दार हे आहेत. लातूर शहरातील देशीकेंद्र शाळेच्या बाजूला असलेल्या पोद्दार हॉस्पिटल च्या माध्यमातून डॉ अशोक पोद्दार हे गेली 24 वर्षे झाले
लातूरकरांची अविरतपणे सेवा करत आहेत. दर रविवारी ते कोणत्या ना कोणत्या खेडेगावात सेवा पोहचवतात, सामाजिक कार्यातही अग्रेसर राहतात.पोद्दार हॉस्पिटल परिवाराच्या वतीने मागच्या सलग 10 वर्षांपासून मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन करत असतात . आरोग्यसेवेसोबतच सामाजिक कार्यातही सातत्याने अग्रेसर असणाऱ्या ज्येष्ठ अस्थि शल्य चिकित्सक डॉ.
अशोक पोद्दार यांना ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्या समाजप्रतीही आपण काही देणे लागतो, या
भावनेने झपाटून टाकले आहे. म्हणूनच ते सातत्याने अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याकामी आघाडीवर असतात. डॉ. अशोक पोद्दार यांच्या या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात केल्या कार्याबद्दल गोवा येथे झालेल्या महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या
कॉन्फरन्समध्ये ऑर्थोपेडिक्स 2022 मध्ये उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीसाठी डॉ. अशोक पोद्दार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. डॉ अशोक पोद्दार यांना हा सन्मान मिळाला याबद्दल लातूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.