महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राज्यात आणि देशातील लातूर पॅटर्नचा चेहरा म्हणून ओळख असलेले प्रा. मोटेगावकर सरांचे RCC क्लासेसच्या वतीने NEET परीक्षेत चांगल्या गुंणांनी उत्तीर्ण होऊन प्रा. मोटेगावकर सरांचे आणि स्वतःचे नाव करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. “कौतुक गुणवंताचे” या कार्क्रमात पांडुरंग आणि
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा होत्या पण सरस्वतीची प्रतिमा नव्हती हे विशेष, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? छगन भुजबळांच्या या विधानावरून
भाजपा आणि ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता . छगन भुजबळ यांच्या विधानाला काही जणांनी समर्थन दिले होते तर काही जणांनी शांत राहून समर्थन दिले होते. पण लातूरच्या प्रा. मोटेगावकर सरांनी तर आपल्या कृतीतून छगन भुजबळ यांना समर्थन दिले का असा प्रश्न उपस्तित होत आहे. राज्यातून विवीध भागातून मोटेगावकर सरांच्या RCC ला शिकण्यासाठी विद्यार्थी आहेत.
मोटेगावकर सरांचा शिक्षण क्षेत्रात मोठा दबदबा आहे. पण सरस्वती मातेचा फोटो कार्यक्रममात न घेता कुठल्या तरी एका पक्षाचा विचार किंवा नेत्याच्या विचारांना आपल्या वागण्यातून समर्थन देने किती योग्य व्हावे! मोटेगावकर सरांनी या कृतीतून काय दाखवण्याचा प्रयत्न केला? विद्यार्थ्यांना शिकण्याच्या वयात राजकारणाचे धडे देत आहेत का ? मोटेगावकर सर, भाजपा कडून छगन भुजबळ यांच्या विधानाचा तीव्र विरोध केला होता तर आता लातूर भाजपा कडून काहीच हालचाली नाहीत हे विशेष .