लातूरचे मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महात्मा गांधी रत्न अवॉर्ड देऊन सम्मान

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – लातूरचे माजी संसदरत्न खासदार प्रोफ़ेसर डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि 16 व्या लोकसभेत ग्रामविकास, जलयुक्त शिवार, मतदार संघात जातीय सलोखा ठेवण्याचं केलेले काम, देशात माहिती तंत्रज्ञान स्थाई समितीच्या माध्यमातुन देशभर ऑप्टिकल फायबर चे काम करुन घेताना वेळोवेळी

सूचना आणि कामाचा तगादा लाऊन केलेले काम, भारतसरकार च्या गृहमंत्रालय च्या राजभाषा समिती मधे दुसऱ्या उप समितीचा कार्यकारी संयोजक या नात्याने संपूर्ण भारतभर हिंदी कामकाजाचा आढावा आणि विशेषःहा दक्षिण भारत जो हिंदी कामकाज करत नव्हता तिथे खास काम करुन आज संपूर्ण देशात हिंदी मधून सरकारी कामकाज होत आहे. या विशेष कामाची दखल

घेऊन अत्यंत मानाचा आणि सन्मानाचा अवार्ड असलेला “महात्मा गांधी रत्न अवार्ड” 2022 हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जुन्या चित्रपटात गेल्या सहा दशकात अभिनय केलेले, जेष्ठ अभिनेते रणजीत, इंडियन मोशन प्रोड्यूसर असोशीयशन चे अध्यक्ष अभिनेते, निर्माते, अनेक हिंदी चित्रपटात अनेक भूमिका केलेले अभिनेते अनिल नागरा, प्रसिद्ध गीतकार संगीतकार

अभिनेते दिलीप सेन, प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक, तिरंगा, मोहरा, असे अनेक चित्रपट निर्मिती केलेले मेहुल कुमार, केएफसी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ कृष्णा चौहान यांच्या हस्ते महात्मा गांधी रत्न अवार्ड देऊन लातूर चे संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा मुंबई येथील मेअर हॉल जुहू येथे मोठ्या शानदार कार्यक्रमात देण्यात आला. डॉ सुनील बळीराम

गायकवाड यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कार्यक्रमाला कामगार नेते अभिजीत राणे,अभिनेत्री साधना मेहता,चित्रपट निर्माते बी एन तिवारी, अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिनेत्री डॉ भारती छाबरीया आणि अभिनेता राजेश टाक यांनी केले. डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या महात्मा गांधी रत्न अवार्ड साठी अनेकानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Recent Posts