महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप) – 30 सप्टेंबर 1993 ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम
करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार हे विदारक चित्र जागा समोर होत. पण हाहाकाराची ही विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती. या भूकंपाला एवढी वर्ष झाली, तरीदेखील त्याची आठवण काढल्यावर लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहते. आज आपण ह्या भूकंपाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. 1) लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील
किल्लारी हे गाव या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपामुळे एक मोठा खड्डा तयार झाला होता, जो अजूनही अस्तित्वात आहे. 2) या भूकंपाने प्रामुख्याने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे प्रभावित झाली होती. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची संख्या लक्षात घेता, मृतांची आणि जखमींची संख्या खूप जास्त होती, कारण लातूर हे त्याच्या घनतेसाठी प्रसिद्ध आहे.अचानक
घडलेल्या प्रसंगामुळे या गावातील लोकांनी आपली घरे सोडण्यासाठी एकच धावपळ सुरु केली आणि त्यातच धक्काबुक्कीमध्ये फक्त 10 किलोमीटरच्या या परिसरात खूप नुकसान झाले. 3) हेडलाईन्सवर भूकंपाची बातमी येताच काही विदेशी आणि स्थानिक देणगीदारांनी मदत पाठवली, तसेच रेस्क्यू टीमला पाठवले. विदेशी देणगीदारांनी 120 ट्रक भरून तंबू, चादरी, अन्न, वस्त्र
आणि वैद्यकीय सुविधा तसेच तात्पुरत्या आश्रयासाठी लागणारे सामान पाठवले. 4) भारतीय लष्कर, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांच्याकडून लगेच बचावकार्य सुरु करण्यात आले. थोड्याच कालावधीमध्ये 46.55 लाख रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आले, तसेच 299 जणांना गुरे देण्यात
आली, जी त्यांनी या भूकंपामध्ये गमावली होती. 5) हैदराबाद आणि मुंबईमधील काही रेडीओ पत्रकारांनी सर्वप्रथम हि बातमी जगासमोर आणली. ते ताबडतोब लातूरजवळ एक छोटे गाव असलेल्या उमरगा येथे पोहोचले, तिथून ते भूकंपग्रस्त भागामध्ये रस्ता मार्गाने पोहोचले. मुंबईस्थित जेएनए (JNA) वायरलेस असोसिएशनने एक विशेष 6 ) लातूरमध्ये झालेल्या
भूकंपानंतरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापित करण्यात आले होते. असा हा लातूरचा भूकंप महाराष्ट्र किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवणारा भूकंप होता. भारताला आणि महाराष्ट्राला या संकटामधून बाहेर काढण्यासाठी जागतिक पातळीवरून देखील विविध मदत करण्यात आली होती.