महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप) – लातूर जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातील सर्व अवैद्य धंदे विशेष करून मटका, गुटका आणि जुगार या धंद्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी छापे टाकून या भागातील सर्व धंदेवाल्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. निकेतन कदम यांनी त्यांच्या कार्यातून सामान्य माणसांच्या मानत जागा निर्माण केली आहे.
कित्तेक गरीब शेतकरी परिवार मटका, जुगारात बरबाद होण्यापासून वाचवले आहे. निकेतन कदम यांनी अनेक जुगार अड्डयावर छापे टाकले आहेत. असाच एक छापा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या विशेष पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदपूर शहरातील साठे नगर येथील तिरट नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला . यावेळी 2 लाख 18
हजार 980 रुपये रोकड आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघे पळून गेले याबाबत अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये 13 जणांविरोधात अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये तुळशीदास रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र केदार यांनी दिली. यावेळी 13 पैकी 11 जणांना पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चिताबंर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र केदार हे करत आहेत.