केंद्रसरकारच्या फ़ूड कॉर्पोरेशन चे माज़ी व्यवस्थापक,बौद्ध चळवळीतील अग्रनी राहिलेले माधवराव लंगड़े यांचे निधन

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधि ) – विक्रोली येथिल रहिवासी, केंद्रसरकारच्या फ़ूड कॉर्पोरेशन चे माज़ी व्यवस्थापक, बौद्ध चळवळीतील अग्रनी नाव असलेले आणि लातूर चे माज़ी ख़ासदार डॉ सुनील बलिराम गायकवाड़ यांचे सासरे व सार्वजनिक बांधकाम विभाग चे मा.सचिव तथा समृद्धि महामार्गचे सह व्यवस्थापक अनिलकुमार बलिराम गायकवाड़ यांचे मामा असलेले

माधवराव झटिंगराव लंगडे यांचे दि 12 सप्टेंबर 2022 रोज़ी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. माधवराव लंगडे हे परिवर्तनवादी विचाराचे होते. त्यानी मृत्युं पूर्वी देहदाना ची इच्छा व्यक्त केली होती त्या नुसार त्यांचे मृत शरीर मुंबई च्या के.ई.एम. या वैद्यकिय महाविद्यालय हॉस्पिटल येथे दान करण्यात आले. त्यांच्या विक्रोलि कन्नमवार नगर येथील निवास स्थानी पूज्य भंते वीररत्न यांनी बौद्ध

पद्धतिने सर्व विधि संप्पन करण्यात आला.
त्यांच्या परिवारात एक मूलगी विशाखा आणि दोन मुले सुबोध आणि संघविनय, सुना रश्मि,अमिता,नातवंडे अनघा, सार्थक, शुभम, सम्यक्, प्रिशा, जानवी, असा मोठा परिवार आहे. देहदान करण्यापूर्वी च्या कार्यक्रमा साठी अनेक मान्यवर मोठया संखेनी उपस्थित होते. मुंबई चेमाज़ी ख़ासदार डॉ किरीट सोमय्या यांनी फ़ोन करुण

दुःखात सहभागी झाले आणि देहदान साठी त्यानी विशेष कौतुक केले. ते महान आहेत असा उल्लेख माधवराव लंगड़े यांच्या साठी केला. अंतिम दर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचे मा.सचिव अनिलकुमार बलिराम गायकवाड़, माधवराव लंगड़े चे भाच्चे कामगार न्यायालयाचे सेवा निवृत मुख्य न्यायधीश विद्यासागर काम्बले ,त्यांचे जावाई लातूर चे माज़ी ख़ासदार डॉ सुनील बलिराम

गायकवाड़,न्यूज़ इंडिया चे महाराष्ट्र प्रमुख आनंद गायकवाड़,मुंबई दक्षता चे संपादक विनायक सानप,आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक आमदार, खासदार,मंत्री यांनी फ़ोन करुण संवेदना व्यक्त केल्या. के.ई.एम हॉस्पिटल चे डीन डॉ बांगर, डॉ अभिजीत आदीनी श्रधांजलि वाहुन माधवराव लंगड़े यांची बॉडी हॉस्पिटल च्या ताब्यात घेतली. त्यानी केलेल्या देहदान मुळे समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.

Recent Posts