पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी भारत गणेश मंडळास गणेशमूर्ती देणाऱ्या फत्तेअहमद हैदरसाब पटेल यांचे केले कौतुक आणि सत्कार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी निलंगा तालुक्यातील नणंद या गावातील गणेश मंडळास गणेश मूर्ती भेट देणाऱ्या फत्तेअहमद हैदरसाब पटेल यांच्या कौतुक आणि सत्कार केला. लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात कायदा सुवेवस्था कौतुकास्पद सांभाळली आहे. निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात कार्य करत असताना

चुकीच्या गोष्टीना आणि गुन्हेगारी व्रत्तीना पायबंद घालण्याचे काम केले आहे. आणि समाजातील एकोपा आणि कायदा सुवेवस्था अबाधित ठेवणाऱ्या व्रत्तीचा आणि लोकांचे कौतुक आणि सत्कार केला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव आनंदानं साजरा करण्यात येत आहे. करोना विषाणूचं संकट टळल्यानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्यानं उत्साहाचं वातावरण दिसून येत

आहे. लातूरकरांनी नेहमीच सामाजिक सलोख्याची परंपरा जपली आहे. निलंगा तालुक्यातील ननंद या गावी फत्तेअहमद हैदरसाब पटेल या मुस्लीम बांधवांनी भारत गणेश मंडळस गणेश मूर्ती भेट दिली त्यातून हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील सामाजिक सलोखा आणखी मजबूत केल्याचं समोर आलं आहे. दोन्ही समाजातील बांधवांनी दाखवलेल्या एकोप्याचं लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः तिथे जाऊन फत्तेअहमद हैदरसाब पटेल कौतुक व सत्कार केला.

Recent Posts