महाराष्ट्र खाकी ( चाकूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विशेषतः रेणापूर आणि चाकूर तालुक्यातील भागात मटका, जुगार, गुटखा अशा अवैद्या धंद्यावर करडी नजर ठेऊन कडक कारवाया दिसून येत आहेत याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर निकेतन कदम यांना, अरूप पटणायक, विश्वास नांगरे
पाटील यांच्या कार्याची निकेतन कदम यांच्या माध्यमातून लातूरकरांना होत आहे. ग्रामीण भागात जुगार, मटका या अवैद्या धंद्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार विसखळीत झाले. या गोष्टी थांबाव्यात म्हणून निकेतन कदम यांनी लातूर जिल्हा पोलीसातील चाकूर उपविभागात येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा
उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हे पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 04/09/2022 रोजी सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळालेल्या माहितीवरून चाकूर पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टामोड येथील एका गणेश
मंडळाचे कार्यकर्ते खेळत असलेल्या तिर्रट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आलेले 11 इसम व पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेले चार अनोळखी इसम यांच्यावर पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 323/2022 कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 27 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास चाकूर पोलीस करीत आहेत. हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम,यांचे नेतृत्वात त्यांच्या पथकातील पोलीस ठाणे चाकूर येथील सहाय्यक फौजदार सुभाष हरणे, पोलीस अमलदार मारुती तुडमे, उदयसिंग चव्हाण, विपिन मामडगे , रियाज शेख, रितेश आनंदुरकर यांनी केली.