महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – बांधकाम क्षेत्रातील अतिशय उल्लेखनीय योगदाना बद्दल भारती प्रॉपर्टीजचे संचालक डॉ. धर्मवीर भारती यांना झी बिझनेस एक्सलेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सहकार
महर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर, समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, लोकप्रिय अभिनेत्री नप्रता गायकवाड यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील निमंत्रित
मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात डॉ. धर्मवीर भारती यांना झी बिझनेस एक्सीलेन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेल्या व्यक्तिमत्त्वाचा ही सन्मान करण्यात आला.