महाराष्ट्र

पानचिंचोली येथे जनावरांच्या बाजाराचे भव्य शुभारंभ

महाराष्ट्र खाकी (निलंगा / प्रशांत साळुंके) – ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी. आजुबाजुच्या गावातील शेतकऱ्यांची सोय व्हावा यासाठी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे ग्राम पंचायतीच्या पुढाकारातून कोरोना काळापासून बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला असून माजी बांधकाम सभापती मधुकरराव पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून

बैलाची पुजा करुन जनावरांच्या बाजाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून विलास पाटील मुरंबीकर, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील,बालाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ पाटील, चेअरमन भगवान पाटील, व्हा.चेअरमन जलील शेख, जेष्ठ पत्रकार सत्यप्रकाश होळीकर, पिरसाब सय्यद, वामन कळसे, काकासाहेब पाटील, युसुफ सय्यद,

काकासाहेब जाधव, अविनाश कळसे, गटसचिव बालाजी मुंडे, ग्रामसेवक दत्ता पुरी, डिंगबर जाधव, डॉ युनूस सय्यद, मधुकर दिवे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागातील बाजाराला चालणा मिळावी यासाठी व्यापाऱ्यांचे मोठे योगदान असल्याने व्यापारी नाजर सय्यद, खयूम मुसामिया आलीशेख मुसा, मुन्ना खुरेशी, वाजीद सौदागर, साजीद सौदागर, इब्राहिम सौदागर, गोपाळ धुमाळ,

अहमद शेख, राजेंद्र भोसले, दत्ता शिंदे, जलील शेख अदींचा शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी सरपंच श्रीकांत साळुंके, उपसरपंच बब्रुवान जाधव, सर्व ग्रा.प सदस्य व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन युसूफ शेख यांनी केले. यावेळी वामन कळसे, ज्ञानोबा बंडगर, प्रदीप जाधव, गोपाळ जाधव, बळीराम कांबळे, अविनाश कळसे, पिरसाब सय्यद, नागनाथ जाधव, दिलीप पाटील अदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

To Top