पोलीस

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लातूर शहरात स्वतः पायी फिरून पाहणी केली

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – राज्यात गणपती आगमनासाठी मांडळे तयार झाले आहेत. त्याच बरोबर राज्य पोलीस देखील तयार झाले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने “श्री” च्या विसर्जन विहिरीची व मार्गाची पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः पायी

फिरून पाहणी केली. “श्री”ची स्थापना व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्या करिता पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व संबंधितांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. लातूर जिल्ह्यात गणेशउत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल

पिंगळे यांनी जिल्ह्यात कायदा सु वेवस्था उत्तम प्रकारे ठेवली आहे. गणेशउत्सवात स्थापने पासून ते विसर्जना पर्यंत लोकांना कुठलीही अडचण येऊ नये या साठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर शहरातील खाकी भागात स्वतः पायी फिरून पाहणी केली.

Most Popular

To Top