महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त जे.एस.पी,एम,लातूर शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आदरांजली वाहिली, यावेळी संस्थेचे
उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कॅम्पस संचालक डॉ.प्रमोद लोळगे, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य गोबिंद शिंदे, प्राचार्य मनोज गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की,
विलासराव देशमुख कुशल संघटक व व्हिजन असणारे होते. त्यांनी मुख्यमंत्री काळात राज्यासाठी व लातूरसाठी विकासात्मक कार्य केले होते. याप्रसंगी प्राचार्य संदिप पांचाळ, शिंदे सर, विनोद सूर्यवंशी, आवस्कर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
उपस्थित होते.