महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – ईडी (ED) कडून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या या कारभाराविरोधात देशभरात काँग्रेसच्यावतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारपासून काँग्रेसकडून देशभर आंदोलन करण्यात येत आहे. सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने लातूर काँग्रेसने माजी मंत्री आमदार अमित
देशमुख यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेत सत्याग्रह आंदोलन केले. लातूर येथील गंजगोलाई येथे आई जगदंबेचा आशीर्वाद घेवून आज केंद्र सरकारच्या तानाशाही विरोधात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने राज्याचे माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या
प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले..
केंद्र सरकारने अन्यायकारक रितीने जनतेवर जीएसटी (GST) लादली,गॅसच्या वाढत जाणाऱ्या किमती,महागाई, बेरोजगारी आणि देशातील अराजकतेवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांनी जनसामान्यांचा आवाज नेहमीच बुलंद केलेला आहे.. तो आवाज दडपण्यासाठी केंद्रीय
तपास यंत्रणाचा गैरवापर करत तानाशाही मोदी सरकार सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.