महाराष्ट्र खाकी (लातूर ) – जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरा नदीच्या काठावर वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. लातूर जिल्हा हरित करण्याची चळवळ पर्यावरण पाणी मृदा संवर्धन करूया दिनांक 24 जुलै 2022 रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी एकाच वेळी वृक्ष लागवड
करण्यासाठी हा उपक्रम होळी या गावी संपन्न करण्यात आला. देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे 0.6 टक्के वनाच्छादित आहे. वनाचं क्षेत्र सरासरी 33 टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूरचा इतिहास असा आहे की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त हि
ओळख संपवण्यासाठी लातूर येथील प्रा. उमाकांत होनराव यांच्या श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या पुढाकारणे लातूर हरित करण्यासाठी होळी या गावात हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक उमाकांत होनराव सर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा संस्थेच्या सचिव सौ सुलक्षणा केवळराम मॅडम संगमेश्वर
चॅरिटेबल ट्रस्टच्या कोषाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या प्राध्यापक प्रेरणाताई होनराव औसा तालुक्याचे तहसीलदार भरात सूर्यवंशी तलाठी साहेब ग्रामसेवक होळी गावचे सरपंच मुकेश जाधव उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवाभावी संस्था, अन्य गावातील नागरिक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या
उपस्थितीमध्ये मांजरा नदीच्या काठावरती वृक्ष लागवड करण्यात आली चारशे नारळाचे झाड दीड हजार बांबूंची झाड केशर आंबे आणि इतर झाडे श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक उमाकांत होनराव, महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा
संस्थेच्या सचिव सौ सुलक्षणा केवळराम मॅडम, उपप्राचार्य राजकुमार केदासे, अधीक्षक श्रीकृष्ण जाधव, भिंगोले सर फड सर, खराबे सर, शेख मॅडम, मुंडे मॅडम, मोरे मॅडम उपस्थित होते.