महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – मुंबई येथे डॉ. कृष्णा चव्हाण फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार ” राष्ट्रीय रत्न सन्मान ” हा अवार्ड लातूरचे मा. खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथील शानदार पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूडचे कंपोजर, संगीतकार, गायक, अभिनेते असलेले दिलीप
सेन ,बॉलीवूड मध्ये गेली अनेक दशके अनेक चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते अनिल नागरा, अनेक चित्रपटात भूमिका साकारलेली प्रसिद्ध सिने अभिनेत्री, निर्माती,दिग्दर्शक, खुद्दार,हॉलिडे, गँगस्टर, अशा हिन्दी चित्रपटात भूमिका केलेली प्रसिद्ध अभिनेत्री आरती नागपाल आणि द बेस्ट मिसेस इंडिया 2021 प्लॅटिनम या पुरस्काराच्या विजेत्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लेखिका
डॉ. परीन सोमानी यांच्या शुभ हस्ते लातूरचे लोकप्रिय माजी खासदार संसद रत्न डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना यावर्षीचा राष्ट्रीय रत्न सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. “राष्ट्रीय रत्न सन्मान” हा पुरस्कार देशभरातील विविध क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती ना हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये लातूर लोकसभेमध्ये 2014 ते 2019 या कालावधीत
लोकसभा मतदारसंघात अनेक कामे करून एक वेगळा ठसा निर्माण केलेले, 16 व्या लोकसभेत अतिउच्च शिक्षित खासदार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड झालेले,आणि लोकसभा मतदारसंघाबाहेर देशभरात हिंदी कामकाजासाठी राजभाषा समितीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात हिंदीचे काम झाले पाहिजे त्यासाठी राजभाषा समितीच्या कार्यकारी संयोजक या नात्याने केलेली उत्कृष्ट
कामगिरी.आज रोजी दक्षिण भारतात आणि नॉर्थ ईस्ट भारतात हिंदी चे कामकाज जे वाढले आहे याला कारण डॉ. सुनील बळीराम गायकवाड हे सुद्धा आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षण दौऱ्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा हा संसदीय कामात त्यांनी उठवलेला आहे.अनेक विधेयका वरती संसदेमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केलेले आहेत. त्यांचे अनेक भाषण संसदीय कामकाजाची
युट्युब आणि लोकसभेच्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहेत.अशा ग्रामीण भागातून आलेल्या परंतु कुठलाही राजकीय वारसा नसताना आपल्या अभ्यासू वृत्तीतून कामाचा ठसा देश पातळीवर उमटवलेला आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन डॉ. कृष्णा चव्हाण फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार राष्ट्रीय रत्न सन्मान पुरस्कार देऊन डॉ. सुनील गायकवाड
यांना गौरवीत करण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी बॉलीवूड मधील अनेक दिग्गज कलाकार सिने अभिनेत्री आरती नागपाल, मिसेस इंडिया डॉ. सोमानी, संगीतकार,गायक, अभिनेते, दिलीप सेन अनेक चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका केलेले अभिनेते अनिल नागरा, अनेक चित्रपटात काम केलेले अभिनेते रमेश गोयल ,अभिनेता निर्माता, दिग्दर्शक,टिनू वर्मा एसीपी
बाजीराव, प्रसिद्ध समाजसेवक तथा संपादक अभिजीत राणे,डॉ. प्रकाश टाटा ,प्रसिद्ध हास्यकलाकार एहसान कुरेशी ,जुन्या काळातील अभिनेत्री साधना मेहता ,असे अनेक दिग्गज कलाकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अतिशय देखणे असे सूत्रसंचालन 2013 ची मिस इंडिया तथा सिने अभिनेत्री सिमरन अहुजा यांनी अतिशय चांगल्या उत्साहात केल्या.