पोलीस

पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते निलंगा तालुक्यातील केळगाव – लांबोटा येथील वन विभाग उद्यानामध्ये वृृक्षारोपण

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील केळगाव-लांबोटा येथील रामलिंगेश्वर मंदिर आणि वन विभाग उद्यानास अचानक लातूर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी भेटी दरम्यान वन विभागाच्या उद्यानास विविध झाडांच्या जातीची पाहणी करून वृृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी वृृृक्षारोपण करत आसताना

या वन विभाग उद्यानास आल्यानंतर विविध जातींच्या झाडांचे व्यवस्थितरित्या संगोपण करण्यात आल्याने मी भारावून गेलो आहे असेही त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच, रामलिंगेश्वर मंदिरात जाऊन पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सपत्निक दर्शन घेऊन तेथील मंदिर परिसराच्या झाडांची वातावरण पाहुन स्तुती केली आहे.अचानक भेटीदरम्यान त्यांनी वन विभागातील

उद्यानास भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांनी यथोचित पाहुणचार केला आहे. त्यांनी विविध झाडांच्या जातीची माहिती घेऊन येथील वन विभाग उद्यानाचे वातावरण पाहुन स्तुती केल्याचे समजते आहे. केळगाव-लांबोटा वन विभाग उद्यान आणि उंच टेकडीवर रामगेश्वर मंदिराची ख्याती आगळीवेगळी असल्याने याठिकाणी बाहेर गावाहुन भाविक-भक्तांची रेलचेल मोठ्या प्रमाणात

असते.माञ, अचानक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सपत्निक येऊन दर्शन घेतले हे विशेष होते. याप्रसंगी वन परिक्षेञ अधिकारी शिल्पा गिते, चंद्रकांत रोडे, आदिनाथ रोडे तसेच वन विभागातील कर्मचारीवृृृंध्द यांची उपस्थिती होती.

Most Popular

To Top