महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात, अज्ञात क्रांतीकारकांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी यासाठी ” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ” 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकांच्या घरावर , कार्यालयांवर
तिरंगा झेंडा फडकेल. यासाठी या स्वराज्य महोत्सवात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ हर घर झेंडा ‘ या मोहिमेच्या तयारीसाठी बोलावलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन )
गणेश महाडिक, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हर घर झेंडा मोहिमेच्या समितीचे सदस्य सचिव डी. बी. गिरी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी अस्थापना, स्वयंसेवी संघटना यांनी या मोहिमेत सक्रिय
सहभाग घेऊन आपल्या कार्यालयांवर तिरंगा झेंडा लावण्याबरोबर प्रत्येक नागरिकांच्या घरावर तिरंगा झेंडा लावण्यासाठी त्यांच्या मध्ये जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
हर घर झेंडा मोहिम अशी असणार
हर घर झेंडा अभियानासाठी जिल्हा परिषद समनव्य संस्था असणार आहे. दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तिरंगा झेंडा स्वयंस्फूर्तीने फडकविणे अपेक्षित आहे. तिरंगा झेंड्याच्या निर्धारित केलेल्या किंमतीमध्ये ध्वज खरेदी
करायचा असून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयातून तिरंगा झेंडा खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात प्रशासनाने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जन जागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा
कार्यालयाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयाची संख्या कर्मचारी यांची संख्या कळवावी जेणे करून पुरवठा दाराला तिरंगा झेंडा भारतीय संविधानाच्या मानकानुसार तयार करण्यासाठीची मागणी नोंदविता येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे तिरंगा झेंड्याचा आकार हा 20 × 30 इंच असा सांगण्यात आला आहे. तिरंगा झेंड्यासाठी खादी ग्रामउद्योग बरोबर जिल्ह्यात सध्य स्थितीत गणेश प्रिंटर्स, संपर्क क्र. 8830639533, रत्नाकर औसेकर, संपर्क क्र. 9890398788 हे पुरवठादार आहेत.