महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – दिनांक 15 जून रोजी ( सन- 2022-23 ) च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाप्रती आदर, आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने लातूरच्या माझं लातूर परिवार या संवेदनशील सामाजिक चळवळीच्या समूहाने भारतीय संविधान उद्देशिका याची प्रत जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालयांना भेट देण्याचा
स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविला. त्याच उपक्रमाला चालना देत निलंगा तालुक्यातील औराद येथील महाराष्ट्र विद्यालयात समूहातील क्रियाशील सदस्य तथा पत्रकार बालाजी थेटे, दिपक थेटे, दत्ता बाेडंगे यांनी संविधान उद्देशिका भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, प्राचार्य वसंत पाटील, उपप्राचार्य प्रदिप पाटील, उपप्राचार्य दयानंद जाधव,
प्रा.सतिश हानेगावे, निवृत्त सहाय्यक निबंधक शेषराव गाेगले यांच्या सह विधार्थी उपस्थित हाेते. या विद्यालयात 1475 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. येत्या 2 दिवसात औराद परिसरातील सर्व विद्यालयांमध्ये संविधान उद्देशिका भेट देण्यात येईल अशी माहिती माझं लातूर परिवाराच्या वतीने पत्रकार बालाजी थेटे यांनी दिली आहे. या उपक्रमाचे सीमावर्ती भागातील विद्यार्थी, पालक, संविधानप्रेमी नागरिकांकडून कौतुक आणि स्वागत केले जात आहे.