महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – भाजपच्या एकाधिकारशाही व हुकूमशाहीला थोपविण्यासाठी शेतकरी व गोरगरीब जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्यात मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या नेतृृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यात आली आम्ही सत्तेत येताच शेतकर्यांना प्रथम कर्जमाफी दिली.भाजपची कर्जमाफी केवळ कागदावरच होती.पण महाविकास
आघाडीची कर्जमाफी थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली. एवढेच नव्हे तर नियमित कर्जफेड करणार्या राज्यातील 10 लाख शेतकर्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.त्याची माहिती संकलन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून लवकरच शेतकर्यांना गोड बातमी कानी पडेल,असे संकेत लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन तथा
लातूर ग्रामीणचे आ.धिरज देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात दिले. पानचिंचोली येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर होते.मंचावर काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय
देशमुख,रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,माजी पं.स.सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अॅड.नारायण सोमवंशी, मधुकर सोमवंशी, संगायो कमिटीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, माजी पं.स.सदस्य महेश देशमुख, गोविंद उसनाळे, विक्रम पाटील, शंकर मोरगे, रामभाऊ पाटील, बालाजी पाटील,
माधवराव धुमाळ, किशोर धुमाळ, दिनकर बिराजदार, प्रा.दयानंद चोपणे, गंगाधर चव्हाण, बंडाप्पा ढेंकरे, सिध्देश्वर बिराजदार, मधुकर जाधव, प्रा.रमेश मदरसे, विकास पाटील, व्यंकट शेळके, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके आदी जणांची उपस्थिती होती. आ.धिरज देशमुख म्हणाले, पानचिंचोली आणि बाभळगावचे नाते अतुट आहे. येथील अनेकजण
दसर्याला बाभळगावला येत असतात.आता मी पानचिंचोलीला आलोय, हा तर ट्रेलर आहे,पिच्छर अभी बाकी है..येणार्या काळात अमितभैया व काका पण पानचिंचोलीला येतील, असे सांगत ( सन-2014 ) नंतर देशात भाजपचे सरकार आले. तेंव्हापासून देशात हुकूमशाही वाढली आहे.सर्वञ व्देशाचे राजकारण सुरू आहे. केंद्रीय यंञणेचा दुरूपयोग केला जात आहे. तरीही
दिल्ली समोर महाराष्ट्र झुकणार नाही, असा इशारा देत नांगर धरणारे जिल्हा परिषद अध्यक्ष मोठ्या बंगल्यात गेले. त्यांचा विकास झाला पण जनतेचा नाही, असा टोलाही लगावत निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. प्रदेश सचिव अभय साळुंके म्हणाले, पालकमंञी अमित देशमुख यांनी निलंगा,शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्याच्या
विकिसासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 10 कोटी 50 लाखांचा निधी दिल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक सरपंच श्रीकांत साळुंके यांनी केले. तर आभाव युसूफ शेख यांनी मानले.
सन-2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी राज्यात काॅंग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही म्हणून अनेकजण आम्हाला सोडून गेले. परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी व जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि मागच्या अडीच वर्षात अनेक लोकोउपयौगी कामे झाली.त्यामुळे आता आम्हाला सोडून जाणार्यांना
पश्चाताप होत असल्याचा टोला प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी लगावत निवडणुकीत थोडा धक्का मलाही दिला असता तर धिरज देशमुख यांच्यासारख मी ही आमदार झालो असतो,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.