महाराष्ट्र

निलंगा तालूक्यातील मांजरा-तेरणा परिसरातील संवेदनशील वाळू घाटावर 144 कलम लागू

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – मांजरा-तेरणा नदीपाञातील कांही ठराविक घाट महसूल विभागाच्या निशान्यावर आले असून निलंगा तालुक्यातील संवेदनशील असलेल्या वाळू घाटावर 144 कलम ( जमावबंदी आदेश ) लावण्यात आल्याची माहिती निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी पञकार परिषदेत दिली. निलंगा तालुक्यातील औराद ( शहाजानी ) स.नं./ गट नं.61,63,64,65 शिऊर

स.नं./ गट नं.1,2,5,6,286,287,291 शिरोळ स.नं./गट नं.74 गिरकचाळ स.नं./गट नं. 4,5,6,7 तगरखेडा स.नं./गट नं.112/ब व 98 /ब,बामणी तेरणा नदी पाञ,माने जवळगा स.नं./गट नं.13 या वाळू घाटावर कलम 144 लागूृृ करण्यात आले आहे. वाळूमाफीयांचा बिमोड करण्यासाठी महसूल विभागाने आता अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.निलंगा

तालुक्यातील मांजरा-तेरणा या दोन नद्या वाहतात सद्यस्थितीला नदीपाञात पाणी असल्याने बोटीव्दारे वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू असून मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे साठवणूक करून ठेवण्यात आले आहेत.याबाबत अनेकवेळा कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला मोठ्या अडी-अडचणीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम

लावण्यासाठी जिल्हाधिकारी पृृृृथ्वीराज बी.पी.लातूर यांनी याची गंभीर दखल घेतली असून, त्यामुळे
जिल्हाधिकार्‍यांनी निलंगा येथील उपविभागीय कार्यालय,निलंगा येथे गेल्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व महसूल कर्मचारी यांना आदेश दिलेत याची काळजी घेत वाळूची सूञे स्वत : कडे घेतली आहेत. पुढील काळात वाळूच्या प्रत्येक हालचालीवर नजर राहणार असून

बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम घालण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घाटाच्या ठिकाणी आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर पथक तयार केले आहे वाळू उपसाच्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथून कोणत्याही सदरद्यस्थितीत बेकायदा वाळू उपसा व वाहतुक होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. या पञकार परिषदेत

प्रोबेशनरी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील,प्रभारी तहसीलदार सुरेश घोळवे,नायब तहसीलदार घन:श्याम अडसूळ हे उपस्थित होते प्रोबेशनरी उपलिभागीय अधिकारी अनुप पाटील यांची वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

Most Popular

To Top