महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – निटूरच्या ग्रामसेवकानी ग्रामपंचायत सदस्यालाच चक्क जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयाच्या बाहेर हाकलून दिल्याची घटना घडल्याने सर्वञ संताप व्यक्त होत असून संबधित मुजोर ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रा. पं. सदस्य बळीराम मदाळे यांनी गटविकास अधिकारी निलंगा यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे. आता
प्रशासन ग्रामसेवकावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे त्यामुळे निटूरची ग्रा. पं. पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निलंगा तालूक्यातील मोठी ग्रा. पं. म्हणून निटूरकडे पाहीले जाते माञ या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून या ना त्या कारणांमुळे सदरील ग्रा. पं. चर्चेत आहे नुकताच शिंदे डेव्हलपर्स कडून घेतलेल्या पाईप लाईन चा अपहार उघड झाला माञ त्याची जबाबदारी
सेवकावर ढकलून पदाधीकारी माञ नामोनिराळे झाले आहेत त्यामुळे याची सुनावनी उप मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. लातूर यांच्या दालनात ठेवण्यात आली आहे त्यामुळे हे प्रकरण शांत होत नाही तोवर ग्रामसेवकांनी आज गुरूवारी सदस्यालाच जातिवाचक शिवीगाळ केल्यामुळे निटूरमध्ये संताप व्यक्त होत आहे. निटूर मधील प्रभाग चार मधून अनूसुचित वर्गातून ग्रा. पं.
सदस्य म्हणून बळीराम मदाळे हे मोठ्या फरकाने निवडून आले आहेत अत्यंत संयमी व शांत कार्यकर्ता म्हणून निटूरमध्ये त्यांची ओळख आहे माञ प्रभागातल्या समस्ये संदर्भात ते ग्रा. पं. मध्ये गेले असता त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिल्याने निटूर ग्रां. पं. चा आणखी एक पराक्रम समोर आला आहे त्यामुळे ग्रामसेवकावर प्रशासन आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे .