महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे राज्यसभा निवडणूकीत सहा पैकी तीन जागेवर भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय संपादन झाल्याने माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांचा या विजयाबद्दल पुष्पगुच्छ देऊन
अभिनंदन केले आहे. माजी पालकमंञी आ.संभाजराव पाटील निलंगेकर यांच्या निलंगा विधानसभा कार्यक्षेञातील निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून चौकात फटाके वाजवून राज्यसभेच्या 03 जागेवर विजयी झालेल्या जागाबद्दल भाजपा परिवार निलंगाच्या वतीने
फाटके वाजवून जल्लोष करण्यात आले. उत्तम नियोजन हा त्यांचा महत्वाचा नेतृत्वगुण, असे आमचे लढवय्ये नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रत्येक व्यक्तीस जोडून हा विजय संपादित करणारे आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे हा विजयी आनंद साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे
तालुकाध्यक्ष शाहूराज थेट्टे,जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे,शहराध्यक्ष अॅड.विरभद्र स्वामी,माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, खतिब,माडीबोणे,शरद पेठकर,सुमित इन्नानी,किशोर लंगोटे,किशोर जाधव, भगवान आण्णा कांबळे, पिंटू पाटील,विष्णू ढेरे, पप्पू तेलंग, जाफर अल्वी, पटणे आप्पा, प्रकाश पटणे,आप्पाराव सोळुंके,अर्जून पौळ, प्रशांत पाटील, आयुब बागवान,पिंटू पांचाळ, आशिष
अट्टल, सुभाष दवणे, नयन माने , रमेश कांबळे, आकाश पेठकर, मिनाज खादिम,खदीर मासुलदार , सचिन गायकवाड,इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
