महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहरानजीक मौजे नांदगाव परिसरात नव्याने सुरू झालेल्या कौशल्या सिल्क या उद्योगाची जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात रेशीम उद्योगाचे क्षेत्र वाढावे याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे बोलून दाखविले. शेतकऱ्यांनी तुतीपासून
तयार केलेला कोष विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ नसल्याने आणि प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही शेतकऱ्याची ही अडचण लक्षात घेऊन मराठवाड्यात जालना यानंतर लातूर येथे नांदगाव परिसरात ऋषिकेश कराड यांनी नव्याने सुरू केलेल्या कौशल्या सिल्क रेशीम या धागा निर्मिती उद्योगास लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शनिवारी सदिच्छा
भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाची पाहणी करत असताना धागा निर्मिती दररोज लागणारा कोष तयार झालेल्या धाग्याची मार्केट रोजगार आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव या बाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी कौशल्य सील्कचे प्रकल्प संचालक ऋषिकेश कराड यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी चर्चा करत असताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. म्हणाले की लातूर जिल्ह्यातील तुतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्ह्यात रेशीम उद्योग आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून जिल्हाभरात ठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना या रेशीम उद्योगासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा शासन पातळीवरून प्रयत्न केला जाईल. या उद्योगात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पोखरा योजना अंतर्गत आणि मनरेगाच्या
माध्यमातून मदत करण्यासाठीही प्रयत्न केला जाईल जेणेकरून आज स्थितीला मराठवाड्यात तू तिच्या क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असलेला लातूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी बोलून दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्यासमवेत रोहयोचे उपजिल्हाधिकारी वाघमारे रेशीम जिल्हाधिकारी वराट
यांच्यासह इतर अधिकारी होते यावेळी कौशल्या सिल्कच्या वतीने त्यांचा ऋषिकेश कराड यांनी सत्कार करून स्वागत केले याप्रसंगी पृथ्वीराज कराड गोपाळ मुंडे, गोविंद कराड, विकास मुंडे, सचिन कराड व इतर अनेक जण होते