महाराष्ट्र

सत्तेत राहून सत्ताधारी मंञ्यांना जे जमले नाही ते अभिमन्यू पवारांनी करून दाखविले – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रशांत साळुंके ) – मी अभिमन्यूला मागील पाच वर्षांपासून नव्हे तर गेल्या पंचविस वर्षांपासून ओळखतो.भाजपाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांचे काम पक्षात मी जवळून पाहीले आहे.ते एक लढवय्ये आहेत.सत्तेत राहून सत्ताधारी मंञ्यांना जे जमले नाही ते अभिमन्यू पवारांनी करून दाखविले.राज्यात कुठेच घडला

नाही असा शेत रस्त्याचा औसा पॅटर्न त्यांच्या कर्तृृत्वाची ओळख दाखवतो. म्हणून अभिमन्यू पवार हे कर्यसम्राट आमदार असून प्रतिकुल परिस्थितीमध्ये संघर्ष करण्याची मानसिकता निर्माण करून तो रडला नाही तर लढला असल्याची शाबासकी माजी मुख्यमंञी तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आ.अभिमन्यू पवारांना दिला. औसा येथील उटगे मैदानावर शनिवारी दि.

4 रोजी मनरेगातून ग्रामविकासाचा औसा पॅटर्न शेतकरी हिताचा या अनुषंगाने केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शेत तेथे रस्ता व मनरेगातून ग्रामसमृृध्दी अभियानांतर्गत मतदारसंघातील एक हजार किलो मिटर शेतरस्ते,मातीकाम तसेच तीनशे किलो मिटर झालेल्या शेतरस्त्याच्या खडीकरण व मजबूतीकरण काम,एक हजार गोठे व एक हजार हेक्टर क्षेञातील

फळबाग लागवड कामांचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले,ग्रामीण भागातील शेत रस्त्याच्या कामाची सुरूवात मी मुख्यमंञी पाणंद रस्तेच्या दळणवळण करण्यासाठी महत्त्वाचे साधन असून याचा शेतीच्या जोडव्यवसायाला मोठा फायदा होतो.अवघ्या दीड वर्षात एक हजार किलोमिटर लांबीचे शेतरस्ते पूर्ण करून ते समर्पित करण्याचे काम अभिमन्यू

पवार यांनी करून दाखविले.सत्तेची सगळी साधने असणार्‍या मंञ्यांना जे जमले नाही,ते शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अभिमन्यू पवार यांनी करून दाखविले.हा राज्याचाच पॅटर्न आहे.त्यांनी सुचविलेल्या व केलेल्या कामाच्या संदर्भात राज्य सरकारनेही आता याची अंमलबजावणी करण्याचे धोरण स्विकारले आहे,हे अभिमानास्पद आहे.मनरेगाअंतर्गत होत असलेल्या

फळबाग लागवडीतून प्रामुख्याने केशर आंबा लागवडीचे भविष्यातील उद्दिष्टे हे आज झालेल्या लागवडीवरून दिसून येते.म्हणून मला खाञी आहे येणार्‍या काळात औसा हा केशर आंब्यांचा हब झाल्याशिवाय राहणार नाही.मेहनतीच्या जोरावर व शेतकर्‍यांच्या विश्वासावर अभिमन्यू पवार यांनी केलेले काम भविष्यासाठी अधिक नेटाने पुढे जावे,अशी आशा व्यक्त करून समोर बसलेल्या

महिलांची लक्षणिय संख्या पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अभामन्यू पवार यांना केंद्राच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या असंख्य योजना असल्याने त्यांचा वापर आपल्या मतदारसंघातील महिला बचत गाटासाठी होईल,अशी सूचनाही त्यांनी केली.कार्यक्रमासाठी मतदारसंघातून हजारो शेतकरी,शेतमजूर,महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक सुभाष जाधव यांनी केले. सूञसंचालन दिपक

चाबुकस्वार यांनी केले. कार्यक्रमास आ.रमेशअप्पा कराड,लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, खा.सुधाकर श्रगारे,माजी आ.पाशा पटेल,माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, विनायकराव पाटील,सुधाकर भालेराव,प्रा.भिमाशंकर राचटे,संतोष मुक्ता,अॅड.मुक्तेश्वर वागदरे,समिर डेंग,प्रविण कस्तुरे,किरण उटगे,काकासाहेब मोरे,संजय कुलकर्णी,महेश पाटील,सिध्दन भेटेकर,धनराज परसने आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

शेत रस्त्याचा मी प्रसारक – केंद्रीय राज्यमंञी भगवंत खुब्बा
पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शेतकर्‍यांसाठी एवठ्या कमी कालावधीत बांधापर्यंत शेतरस्ता नेणारा एकही आमदार मी पाहिला नाही.आज हजारो शेतकरी त्याच बरोबरीने महिलांची या मेळाव्यात असलेली उपस्थिती आपण केलेल्या कामाचे कौतुक आहे.शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी

प्रयत्नशील आहेत.त्यांच्याच विचाराचा वारसा आज अभिमन्यू पवार यांनी साकारला.ही फार मोठी उपिलब्धी असून राज्यात त्यांचा हा पॅटर्न सर्वञ नावलौकिक करीत असून आता देशभरामध्ये अभिमन्यू पवार यांच्या शेतरस्त्याच्या पॅटर्नचा प्रसार आपण करू,असे गौरवोउद्गगार केंद्रीय रसायने व खते राज्यमंञी भगवंत खुब्बा यांनी काढले.

आम्हा शिकण्यासारखे – आ.संभाजी पाटील निलंगेकर
एकमेकांच्या चांगल्या गोष्टी घेणे यातूनच राजकीय जीवनात आपण लोकांसाठी कांहीतरी करू शकतो,असे काम आमदार अभिमन्यू पवार यांच्या कर्तृृृृत्वातून दिसून येते.जिल्ह्याचे नव्हे तर राज्यात अवघ्या दीड वर्षात एक हजार किलोमाटरचे रस्ते तयार होऊन ते लोकार्पण

होतात,हे आमच्या सारख्यांनाही शिकण्यासाठी आहे.मतदारसंघातील शेत रस्त्याचा पॅटर्न आमच्या भागातही राबविण्यासाठी अभिमन्यू पवारांची मदत मोलाची ठरणार असल्याचे लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

Most Popular

To Top