निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधवांना दीड लाखाच्या लाच प्रकरणात ACB ने केली अटक!

महाराष्ट्र खाकी ( निलंगा ) – निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी देखील त्यावर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे तेच वाळू माफियांशी हातमिळवणी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बिनबोभाट कुठलीही कारवाई न करता अवैध वाळू वाहतुकीला परवानगी हवी असेल तर तीन लाख दे,अशी मागणी करणार्‍या व ती लाच

स्विकारणार्‍यास निलंगा येथील तहसीलदारास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी एका व्यक्तीकडे प्रति ट्रक तीस हजाराची मागणी तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यांनी केली होती.त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण 1 लाख 80 हजार रूपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडी

अंती दीड लाख रूपये देण्याचे ठरले.तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यांच्या घरासमोर स्वत: गणेश दिगंबरराव जाधव आणि खाजगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे रा.शेंद यांना ही रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तक्रारदाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर यापुठे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक

30 हजार याप्रमाणे दोन ट्रकचे 60 हजार महिना या प्रमाणे तीन महिन्याचे 1 लाख 80 हजार रूपये तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यानी मध्यस्थीमार्फत मागितले होते.तडजोडीनंतर दीड लाखाची रक्कम एजंट रमेश गुंडेराव मोगरगे रा.शेंद यांचे कडे देण्यास सांगण्यात आले होते.त्याप्रमाणे दि.4 जून रोजी रमेश गुंडेराव मोगरगे रा.शेंद याने निलंगा येथे तहसीलदार गणेश दिगंबरराव

जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रूपये पंचासमक्ष घेतली. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ दोन्ही आरोपींना पकडले.या कारवाईने निलंगा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान लातूर जिल्ह्यातील मांजरा-तेरणा नदीत अवैध वाळू उपशासाठी बोटींचा सर्रास वापर केला जात आहे.पर्यावरण विभागाने सगळे नियम धाब्यावर बसवून हे प्रकार सुरू

आहेत.अवैध वाळू उपशा संदर्भात अनेक तक्रारी असूनही तहसीलदार कारवाई करत नव्हते.तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव यांच्या औरंगाबादेतील घरावर देखील छापे टाकण्यात आल्याचे समजते.

Recent Posts