महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची देशमुख परिवार आणि महाराष्ट्रातील चाहते आणि जिल्ह्यातील आमदार, काँग्रेस कार्यकते यांच्या उपस्तितीत आज गुरुवार ( दि.26 ) 77 वी जयंती साजरी करण्यात आली. बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण करुन त्यांना कुटुंबीयांच्या वतीने अभिवादन करण्यात
आले. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विलासराव देशमुखांविषयी आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, स्व. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविताना ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे, उत्तम प्रशासकीय कौशल्य असणारे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.
विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! .वसा लोकसेवेचा…वारसा समृद्ध विचारांचा…! महाराष्ट्राचे हित सदैव जपणारे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! लोकसेवेच्या कार्यातून साहेबांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा जपला जावा यासाठी
आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत, या शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी वडिलांना अभिवादन केले. जनसेवेसाठी राजकारणाला साधन ठरवून सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारणारे,प्रेरणास्त्रोत राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना 77 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!, या शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री
अमित देशमुख यांनी आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी, दूरदर्शी आणि सर्वसमावेशक नेतृत्व, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नरत राहिलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!,अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.