महाराष्ट्र

पोद्दार हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत अस्थिरोग शिबिर संपन्न

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 77 व्या जयंती दिनानिमित्त लातूर शहरातील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटल अक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दि.26 गुरुवारी मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या मोफत अस्थिरोग शिबिरास नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 155

रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी दिली. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनानिमित्त अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात येते. समाजसेवा आणि रुग्ण सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या डॉ. अशोक पोद्दार यांच्या हॉस्पिटलच्या

माध्यमातून घेण्यात आलेले हे 132 वे आरोग्य शिबिर आहे. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारच्या विविध सामाजिक व आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाते. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून गुरुवार,दि. 26 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक

अमन मित्तल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दीपक सूळ, माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख, माजी उपमहापौर कैलास कांबळे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष एड. किरण जाधव, IMA चे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. दीपक गुगळे, डॉ. सचिन भराडिया, संजीव भार्गव, हरीशभाई ठक्कर, सुनील कोचेटा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.यावेळी आपले विचार व्यक्त करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी डॉ. अशोक पोद्दार यांच्या आरोग्य क्षेत्रातील अशा नेत्रदीपक उपक्रमाचे कौतुक करून ते सातत्याने कायम रुग्णसेवेत तत्पर असतात, हे आपण अशा प्रकारच्या शिबिराच्या

माध्यमातून अनेकदा अनुभवल्याचे सांगितले. त्यांच्या आरोग्य सेवेचा हा यज्ञ भविष्यातही असाच अखंडितपणे चालत राहील, अशी अपेक्षाही मित्तल यांनी यावेळी व्यक्त केली. दीपक सूळ यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करून या अभिनव आरोग्य विषयक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. डॉ .अशोक पोद्दार यांनी आपले मनोगत व्यक्त मागच्या अनेक वर्षांपासून आपण हा मोफत आरोग्य

शिबिराचा उपक्रम राबवत असल्याचे नमूद केले. गोरगरीब व गरजू रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपण असे उपक्रम सातत्याने करीत असल्याचे सांगून डॉ. अशोक पोद्दार यांनी यापुढेही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतील असे सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत अस्थिरोग, फिजिओथेरपी , मशीनद्वारे हाडांच्या

ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना रुग्णांना उपलब्धतेनुसार मोफत औषधीही वितरित करण्यात आली. या शिबिरात सहभागी झालेल्या एकूण रुग्णांपैकी 56 रुग्णांचे 5 रुग्णांची सिटीस्कॅन तर 9 रुग्णांची सवलतीच्या दरात एमआरआय तपासणी करण्यात अली. त्याचप्रमाणे चार रुग्णांची सोनोग्राफीही करण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची

डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. तुषार पिंपळे, डॉ. अतुल उरगुंडे, डॉ. शिल्पा राठी, डॉ. हत्ते या अस्थिरोग तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. या शिबिरात फिजियोथेरपीस्ट डॉ. पल्लवी जाधव, डॉ. रेणूका पंडगे, डॉ. मयुरी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसगे यांसह पोद्दार हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफने आपले योगदान दिले. या शिबिरास रुग्णांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Most Popular

To Top