महाराष्ट्र खाकी ( औरंगाबाद ) – शासन मान्य NGO बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक जीवन गौरव च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांना लातूरचे माजी खासदार प्रो.डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा खा. डॉ सुनील गायकवाड हे उपस्थित होते. लातुर चे मा. खासदार प्रो. डॉ. सुनील गायकवाड यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये केलेल्या विविध लोक उपयोगी कामाचा आणि 16 व्या लोकसभेत खासदार म्हणून काम करत असताना लोकांची केलेली कामे, विशेषता कॅन्सरग्रस्त रुग्णांना पाच वर्षांमध्ये करोडो रुपयांची प्रधानमंत्री कडून केलेली मदत, आणि लातूर
साठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, पासपोर्ट कार्यालय, विभागीय पोस्ट ऑफिस,रेल्वे बोगी कारखाना, नॅशनल हायवे, केंद्र सरकारच्या विविध योजना,लातूर लोकसभा मतदार संघात एक लाख परिवाराला उज्वला गॅसचे मोफत कनेक्शन, पन्नास हजार परिवाराला प्रधानमंत्री घरकुल योजना चा लाभ, जनधन चे मोठ्याप्रमाणात अकाउंट ओपन करून घेणे,वृध्द कलावंत ना केंद्र सरकार कडून
पेन्शन सुरू केले, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी लातूर, नांदेड साठी नीट परीक्षा सेंटर सुरु केले अशा अनेक महत्त्वपूर्ण कामाची दखल घेऊन मासिक जीवन गौरव हे सामाजिक साहित्यिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्यांना आणि विशेषता शिक्षकांना हा पुरस्कार देत असतात डॉ. गायकवाड यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन साहित्य सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र शासन
चे माजी अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातून शिक्षक दाम्पत्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मा.खासदार डॉ. सुनील गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत माजी अध्यक्ष सांस्कृतिक साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य
आणि साकेत प्रकाशन चे संस्थापक बाबा भांड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटक प्रो. डॉ. सुनील गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व दलित परिषदेचे महासचिव प्रो.डॉ. वाल्मीक सरोदे, विश्व दरीत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सिरीन वारे ,अरुण सुरडकर पत्रकार,
कर सल्लागार सुभाष मगरे ,जीवन गौरव चे उपसंपादक बीबी शिंदे ,जीवन गौरव च्या संपादिका डॉक्टर रत्ना चौधरी ,जीवनगौरव चे कार्यकारी संपादक संदीप सोनवणे, हे उपस्थित होते.या देखण्या आणि शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध व्याख्याते व प्रवचनकार भगवान विशे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रसिद्ध साहित्यिक व कवी हनुमंत पडवळ यांनी केले. जीवन गौरव पुरस्कार यशस्वी
करण्यासाठी जीवनगौरव या मासिकाचे संपादक रामदास वाघमारे, मीरा वाघमारे ,कैलास वाहुळ, संजय हिंगोलीकर, कल्याण अन्नपूर्णे, विश्व दलित परिषदेचे पंकज खरात,विशाल इंगळे ,अल्ताफ शेख, प्राध्यापक आशोक राठोड,ऋत्विक उर्फ जीवन वाघमारे,प्रेरणा आजादे, दिपक वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर सतीश मस्के, रूपाली बोडके, वैशाली भामरे, शेख नजमा नईमुद्दीन, कल्पना पुसे, गीता
केदारे, भाग्यश्री सलवार, छाया अनिता कांबळे ,अंजली गोडसे,शिल्पा फरांदे, अर्चना खोब्रागडे ,सावर्डेकर वंदना, सरवदे संदीप ,ढाकणे शरद, ठाकर हनुमंत,पडवळ पंडित, डोंगरे विजय, पाताडे गोपाल, सूर्यवंशी दयानंद, बिराजदार, रज्जाक शेख, मारुती गुरव, स्वामी, जाधव, देविदास बुधवंत, संतोष दातीर, प्राध्यापक भगवान विषय,शांत निमकर, कुणाल पवार ,ज्योती अवघडे,
वैशाली भोजने, प्राध्यापक संपत गरजे ,शोभा दळवी ,मारुती आरेवार, मनीषा साळवे,दत्तात्रय शिंदे ,विजयकुमार काळे, प्राध्यापक विजय पगारे ,आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतला. अतिशय शानदार अशा या कार्यक्रमाचे आयोजन संपादक रामदास वाघमारे यांनी केले होते. शिक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. सर्व पुरस्कार प्राप्त चे स्वागत आणि अभिनंदन संसद रत्न माजी खासदार प्रो.डॉ. सुनील गायकवाड आणि साकेत प्रकाशन चे संस्थापक बाबा भांड यांच्या हस्ते करण्यात आले.