महाराष्ट्र

औशाचे आमदार अभिमन्यू पवार नरेगा योजनेच्या पाठपुराव्यात राज्यात प्रथमस्थानी – अप्पर मुख्य सचिव नंदकुमार

महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रशांत साळुंके ) – पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतील काही उणिवा लक्षात घेऊन राज्यात मातोश्री पाणंद रस्ते योजना आणली या योजनेसाठी नवीन अध्यादेश काढला जेव्हा अशा योजना तयार होतात तेव्हा ज्या गोष्टी लक्षात येतात त्याचा समावेश केला जातो. जेव्हा या योजना अंमलात येतात तेंव्हा प्रत्यक्ष काम करणारे लोक अडचणी सांगतात त्या अडचणी दूर करण्यासाठी

पुढचा अध्यादेश काढला जातो या प्रक्रियेत आमदार अभिमन्यू पवार यांचा मोठा सहभाग असून आशा कामात राज्यातील चार – आमदार सातत्याने पाठपुरावा करतात यामध्ये औशाचे आमदार अभिमन्यू पवार एक नंबरवर असल्याचे प्रतिपादन रोहयोचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले आहे. दि.20 मे रोजी नागरसोगा (ता.औसा) येथे आ. अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व

क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या पुढाकारातून आयोजित मनरेगातून ग्रामसमृद्धी कार्यशाळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, सहआयुक्त जी.श्रीकांत, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने,

उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार भरत सूर्यवंशी, तहसीलदार गणेश जाधव,तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, क्रिएटिव्ह फाऊंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव सुहास पाचपुते आदी उपस्थित होते. यावेळी अप्पर सचिव नंदकुमार पुढे म्हणाले की प्रत्येक

शेतीला शेतरस्ते पाहिजे ज्यामुळे पिकवलेला माल योग्यवेळी बाजारात जातो.पिकविण्यासाठी सर्व यंत्रणा शेतात जाते. नरेगा हि योजना केवळ दुष्काळ काळात राबवायची योजना नाही.या योजनेतून पैशाचा दुष्काळ दुर करा जोपर्यंत लखपती होत नाही तोपर्यंत काम करा. या योजनेसाठी भरीव निधी आहे.मात्र खुप कमी निधी खर्च होतो. आपण या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर

अनेक शासन निर्णयातील खिळे उपसून काढले असून आता नरेगा पारदर्शक आहे. कारवाई व बदमाशाचे दिवस संपले या योजनेतून लोकांना लखपती करायचे दिवस आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्याचे कृषी प्रधान सचिव बोलताना म्हणाले की आमदार अभिमन्यू पवार हे एक संघटक म्हणून काम करत असल्यापासूनचे माझे संबंध आहेत. त्याच्या कामाची ओळख संघटक व

कार्यकर्ता अशीच राहिली आहे. आणि त्यांच्या अंगातील कार्यकर्ता आजही जीवंत आहे. सरकारी योजना समजून घेतल्यावर काय होवू शकते याचे ज्वलंत उदाहरण यांनी आज आमदार अभिमन्यू पवार यांनी दाखविले आहे. एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते एका विधानसभा मतदारसंघात म्हणजे खुप मोठे काम आहे. आपले जगणे शेतीशी आहे आणि आपला श्वास शेती आहे. आपल्याला

पूरक व्यवसायासाठी शेतरस्ते ची गरज आहे. याचे महत्त्व आपण जाणले यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांना साथ दिली याचे फलित समोर आहे. लातूर ची ओळख नाविन्यपूर्ण संकल्पना सहज स्वीकारून ती आत्मसात करण्याची परंपरा आहे. कोणतेही नवीन बदल स्वीकारणे आणि त्यातून प्रगती साधणे या परंपरेचा भाग असल्याचे सांगून त्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी असताना

नकाशावरील शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करतानाच्या आठवणी सांगितल्या. यावेळी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियाना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात आ. अभिमन्यू पवार यांनी आपण

हाती घेतलेल्या मागेल त्याला शेतरस्ते अभियानासाठी निधी कमी पडू देणार नसून पर्यायी विधान परिषद व राज्यसभा सदस्यांकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगून यावेळी विविध प्रकारच्या मागण्यांबाबत रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार व कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सकारात्मक विचार करण्याची विनंती केली. त्याच्या भाषणादरम्यान त्यांनी विविध मागण्यां केल्या.

Most Popular

To Top