महाराष्ट्र खाकी (सांगली ) – सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण ( LCB ) विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्या जागी आपलीच वर्णी लागावी, यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलिस अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. LCB ला हद्दीची मर्यादा नाही. जिल्हाभर ते काम करू शकतात. 80 जणांचा सध्या स्टाफ आहे. त्यामुळे येथे येण्यासाठी अनेक
अधिकार्यांची आतापासून धडपड सुरू झाली आहे. काहींनी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 31 मेपर्यंत काही अधिकार्यांचा जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण होत आहे. नवीन अधिकारी दाखल होतील. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम हे जुन्या अधिकार्यांना या विभागात संधी देणार का, नवीन येणार्या अधिकार्याची नियुक्ती करणार, याकडे
सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, काही महिन्यापूर्वी या विभागातील 15 कामचुकार कर्मचार्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. शनिवारी सांगली शहर, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील DB शाखेतील 9 कर्मचार्यांची LCB मध्ये नियुक्ती केली आहे.