महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – जळगाव, पुणे येथे दीपस्तंभ फाउंडेशनच्यावतीने मनोबल व संजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कार्य करणार्या यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनला लातूर येथील ‘ RCC ‘ शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत 1 लाख रूपयांची देणगी दिली आहे.
RCC या शैक्षणिक संकुलातून घडणारे गुणवंत विद्यार्थी व उज्ज्वल निकालामुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचविणारे प्रा.शिवराज मोटेगावकर हे शैक्षणिक क्षेञाबरोबर सामाजिक कार्यात देखिल सातत्याने सहभागी होत असतात.
दिव्यांग,वंचित मुलांना चांगले शिक्षण मिळावे,त्यांना समाजात मान मिळावा यासाठी काम करणार्या दीपस्तंभ संस्थेतील मुलांच्या शैक्षणिक उज्ज्वल वाटचालीसाठी प्रा.शिवराज मोटेगावकर यांनी एक लाख रूपयांची देणगी दिली आहे. देणगीचा धनादेश प्रा.शिवराज मोटेगावकर व सौ.मिनल मोटेगावकर यांच्या हस्ते प्रा.यजुवेंद्र महाजन यांना सुपूर्द करण्यात आला.