देश

पंतप्रधान मोदींचे जैव इंधनावावरील धोरण बांबू चळवळीला पाठबळ देणारे – पाशा पटेल

महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रशांत साळुंके ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 18 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जैवइंधन (बायोफ्यूल) वरील राष्ट्रीय धोरण-2018 ला अनेक सुधारणासह मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. उत्पादन वाढवण्यासाठी आणखी अनेक पिकांचा समावेश यामध्ये करण्यास परवानगी देण्यात

आलेली आहे, पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य आता 2030 ऐवजी 2025-26 करण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणापासून पृथ्वी रक्षणासाठी मोदींनी घेतलेला हा निर्णय म्हणजे आमच्या पर्यावरण पूरक बांबू चळवळीला एकप्रकारे सरकारी धोरणाचे पाठबळ असल्याचे पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांनी म्हटले आहे. वाढते

प्रदूषण आणि ग्लोबिंग वार्मिंगपासून पृथ्वी रक्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिकता दिलेली असून, त्याचाच एक भाग म्हणून सौरऊर्जा निर्मिती, जैवइंधन अर्थात पेट्रोल मध्ये पर्यावरणपूरक 20 टक्के इथेनॉलचा वापर, बॉयलर आणि वीज निर्मिती प्रकल्पात इंधन म्हणून दगडी कोळसाला पर्याय बांबू कांड्याचा वापरास प्राधान्य दिलेले आहे. मोदींची पर्यावरणपूरक संकल्पना प्रत्यक्षात

उतरविण्यासाठी पाशा पटेल हे बांबू लागवड चळवळ आणि बांबूपासून इथेनॉल निर्मितीवर विशेष भर देत आहेत. यासंदर्भात ते देशभर जनजागृती करत असून, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांबु लगवड सुरू झालेले असून, औष्णिक वीज प्रकल्प आणि महाराष्ट्रातील अनेक कारखान्यात बॉयलरमध्ये इंधन दगडी कोळश्यासोबतच बांबूचा वापरही सुरू होत आहे. मोदी साहेबांच्या

अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले राष्ट्रीय जैव-इंधन धोरण पाशा पटेल यांच्या बांबू चळवळीला पाठबळ देणारे आहे. पेट्रोल-मध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी सन 2030 हे वर्ष निश्चित करण्यात आले होते. मात्र, ही नियोजित कालमर्यादा सरकारने 5 वर्षाने कमी करून पुढील दोन वर्षांत म्हणजेच सन 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल

मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, यावरून सरकार जैवइंधनाच्या वापराबाबत किती गंभीर आहे, याची प्रचिती येत असल्याचे सांगत पाशा पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या धोरणात्मक निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे. या नव्या धोरणामुळे महागड्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या नियमांनुसार तेल

कंपन्या 20 टक्के इथेनॉलच्या मिश्रणासह पेट्रोल विकतील असे ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड चे गवरनिंग कौन्सिल चे सदस्य मा.पाशा पटेल यांनी सांगितले . जैव-इंधन उत्पादनासाठी अधिक फीडस्टॉकला मान्यता, 2030 पूर्वी 2025-26 मध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य साध्य करणे, मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत विशेष आर्थिक क्षेत्रे /निर्यातभिमुख

युनिट्सद्वारे देशातील जैवइंधन उत्पादनास प्रोत्साहन देणे, एनबीसीसीमध्ये नवीन सदस्यांची भर, विशेष प्रकरणांमध्ये जैवइंधनाच्या निर्यातीला परवानगी देणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय सदर बैठकीत झाल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.

Most Popular

To Top